महाराष्ट्र
कर्तव्यात कसूर केल्यामुळे ग्रामसेविकेविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी.
धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला येथील तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती डांगे पी.एम यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत सुनील काळे यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीमधून अखर्चित निधीसंदर्भात माहिती मागितली होती परंतु ग्रामसेविकेने जाणून बुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती धाराशिव यांच्याकडे मागील सहा महिन्यापूर्वी केली होती, परंतु “सरकारी काम आणि सहा महिने थांब” या उक्तीप्रमाणे सहा महिन्याचा कालावधी लोटला गेला तरीही तक्रारीची ना चौकशी झाली ना कारवाई.त्यामुळे सुनील काळे यांनी प्रशासन व पंचायत समितीची कमजोर कार्यपद्धती यावर तीव्र नाराजी व्यक्त करुन दि. 29.04.2025 रोजी पुनश्च गट विकास अधिकारी पंचायत समितीतसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,धाराशिव यांचेकडे याप्रकरणी चौकशी करुन माहिती अधिकार कायद्यातील नियमभंग केल्यामुळे तसेच शासकीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यामुळे दोषी ग्रामसेविकेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत तक्रार केली आहे. याप्रकरणी गटविकास अधिकारी यांनी दोषी ग्रामसेविकेचा बचाव न करता नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करणे अपेक्षित आहे.