19/04/2026

Connect with Us

Social menu is not set. You need to create menu and assign it to Social Menu on Menu Settings.

महाराष्ट्र

https://advaadvaith.com

          दर्पण न्यूज     सांगली : सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून 0 ते 18 वर्षे वयोगटातील ह्रदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2डी इको शिबीर घेण्यात आले. सिध्दीविनायक हॉस्पिटल, ठाणे येथील बालह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील 128 ह्रदयरोग संशयित बालकांची या शिबिरांतर्गत मोफत तपासणी करण्यात आली. शिबीरात पात्र 33 लाभार्थींच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणावरुन अनुदान उपलब्ध करुन तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयामध्ये  पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.             डीईआयसी इमारत सिव्हील हॉस्पिटल आवार, सांगली येथे आयोजित या शिबिराचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर उपस्थित होते.              या कामकाजाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील तपासणी पथकांच्या कामकाजाचे कौतुक केले व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेवर तपासणी करुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करुन घेतल्याबददल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे त्यांनी आभार मानले....
    सांगली : राज्यातील माहे जानेवारी 2024 ते  डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व...
    दर्पण न्यूज  कोल्हापूर  :- वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास...
  दर्पण न्यूज येडशी प्रतिनिधी संतोष खुणे :- धाराशिव तालुक्यातील येडशी गावचे सुपुत्र गणेश पांडुरंग गायकवाड हे...
   दर्पण न्यूज कोल्हापूर,ः अनिल पाटील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा...
      दर्पण न्यूज सांगली : सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सन 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार...
Don`t copy text!