दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) : -लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच संस्थापक आमदार ॲड. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श इन्स्टिट्यूट मध्ये भव्य अंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात व अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. मन मेंदू आणि मनगट बळकट असेल तर या विश्वात आपल्याला कोणत्या ही क्षेत्रात अपयश येणार नाही म्हणूनच विद्यार्थ्यांचा चौफेर विकास व्हावा यासाठी लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट प्रयत्नशील असते ज्यांच्या नावाने ट्रस्टची स्थापना केली त्यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवणे तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा प्रयत्न नेहमीच आदर्श परिवार करत असते यावर्षी विविध उपक्रम वृक्षारोपण क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते
या उपक्रमाला संस्थेचे संचालक श्री पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील, आर्थिक संचालक श्री रवीराज सुर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डॉ पी. एस. पाटील , फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ निरंजन महाजन तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालक सचिन शिंदे यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते त्यांच्या प्रेरणेमुळे स्पर्धा शिस्तबद्ध, खेळाडूवृत्ती जपत आणि उत्साहाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडल्या.
स्पर्धेमध्ये सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम निकालामध्ये डिग्री विभागाने प्रथम क्रमांक पटकावला, तर डिप्लोमा विभागाने द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेतील सातत्यपूर्ण, सर्वांगीण आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल मयूर कदम यांची उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी सर्व विजेत्या संघांना, उत्कृष्ट खेळाडूंना व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि निरोगी स्पर्धेची वृत्ती अधिक दृढ झाली. भविष्यातही अशाच प्रेरणादायी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाईल असे मत शारिरिक शिक्षक सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.