दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव शहर पोलीस ठाणे- धाराशिव शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्यांना दि.12.07.2026 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, स्कॉर्पिओ वाहन क्र एमएच 25 बी.एफ. 3696 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेशकुमार राउत पोलीस ठाणे धाराशिव शहर चे पथकाने तेरणा इंजिनिअरींग कॉलेज समोर हायवेवर धाराशिव येथे 23.45 वा. सु. छापा टाकला असता स्कॉर्पिओ वाहन क्र एमएच 25 बी.एफ.3696 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा डायरेक्टर पान मसाला 40 गोण्या 1800 पॅकेट,SHOT LUXURY CHEWING TOBACCO चे 40 गोण्यात 1800 पॅकेट एकुण 10,36,800₹ व काळ्या रंगाची स्कॉरपिओ गाडी क्र एमएच 25 बी.एफ. 3696 असे एकुण 25,36,800₹ किंमतीचा माल मिळून आला. मिळून आलेला माल जप्त करुन माल सह आरोपी नामे-1) गणेश मारुतीराव धुमाळ, वय 34 वर्षे, रा. उपळाई रोड एकता गणपती चौक बार्शी जि. सोलापूर, रोहन रविंद्र कदम रा. आळणी, जाफर जमादार रा. आळण राज्य कर्नाटक, अमोल गुंजाळ, पवन जिवन पौळ, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांचे विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुरनं 319/2026 भा.द.वि. सं. कलम 123, 274, 275, 223, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरेशकुमार राउत यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे, पोलीस अमंलदार माळी, पोलीस अमंलदार जाधवर यांच्या पथकाने केली आहे.