गुङाळेश्र्वर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी आशिष पाटील तर उपाध्यक्षपदी मनीषा पाटील— सावकर यांची निवङ

कोल्हापूरः अनिल पाटील
गुडाळ ता.राधानगरी येथे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि तालुक्यातील जुन्या मोजक्या सहकारी संस्थांमध्ये समावेश असलेल्या गुडाळेश्वर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी आशिष लक्ष्मणराव पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदी सौ. मनिषा दत्तात्रय पाटील-सावकर यांची एकमतानी निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी राधानगरीचे सहाय्यक निबंधक अमित गराडे हे होते.
गुडाळ येथील ही एकमेव विकास संस्था असून 21 जून 1947 साली संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेवर भोगावतीचे माजी संचालक ए डी पाटील, महादेवराव कोथळकर,स्वर्गीय व्ही डी पाटील गट यांच्या आघाडीची सत्ता आहे. आघाडीच्या धोरणाप्रमाणे मावळते चेअरमन डॉ. ए बी माळवी आणि व्हा. चेअरमन भिकाजीराव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर या निवडी करण्यात आल्या.
याप्रसंगी आघाडीचे नेते ए डी पाटील, महादेवराव कोथळकर,भोगावतीचे संचालक अभिजीत पाटील, मावळते चेअरमन डॉ. ए बी माळवी,आनंदराव माळवी,बँक निरीक्षक इंद्रजीत पाटील, भोगावतीचे माजी संचालक श्रीपतराव कांबळे, गणपतराव मोहिते, पांडुरंग आवळकर आदी मान्यवरासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विकास संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी उपस्थित होते. आघाडीच्या नेते मंडळीचा विश्वास सार्थ ठरवून विकास संस्थेचा कारभार अधिक सभासदाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही चेअरमन आशिष पाटील यांनी आपल्या भाषणात दिली. नूतन चेअरमन श्री.पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा दूध संघ कर्मचारी पतसंस्था, गुडाळेश्वर दूध संस्था या संस्थावर चेअरमन म्हणून काम केले आहे.
श्री पाटील आणि नूतन व्हाईस चेअरमन सौ. मनिषा दत्तात्रय पाटील हे ए डी पाटील यांचे समर्थक आहेत राजाराम पाटील यांनी स्वागत केले तर लक्ष्मण पाटील यांनी आभार मानले.