

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- जीवनविद्या कोचिंग क्लासेसमध्ये वाहतूक नियम व कायदे यासंबंधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विटा पोलिस मित्र मा. शिराज शिकलगार यांनी वाहतूकीचे नियम व कायदे यासंबंधी जनजागृती केली. सर्वांनी कायद्याचं पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
आयुष्यात विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचं आचरण करावे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितले.
यावेळी जिवनविद्या कोचिंग क्लासेस चे संचालक रोहिदास शिंदे यांनी शिराज शिकलगार यांचं स्वागत व आभार मानले. यावेळी क्लासचे सह. शिक्षक सौ. उमा दर्शन चोथे, सौ सुनिता शिंदे उपस्थित होते.