बेफीकीर प्रशासन ; नेत्यांचा बडेजाव अन् भिलवडीतील अपघात सत्र लोकांच्या माथ्यावर

दर्पण न्यूज भिलवडी (अभिजीत रांजणे) -; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे काही दिवसांपूर्वी शाळेकरी मुलाचा अपघात झाला, त्यात तो देवाघरी गेला. असे अपघात यापूर्वी झाले होते आणि काही लोक देवा घरी गेले होते. मात्र, या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला अजूनही जाग येत नसेल तर निर्लज्जपणचा कळसच म्हणावा लागेल. या बेफीकीर प्रशासन आणि नेत्यांच्या बडेजावपणामुळे तर नुसतेच नेत्यांच्या पाठीमागून लुटपूट करणाऱ्यांमुळे भिलवडीतील अपघात सत्र लोकांच्या माथ्यावर पडत आहे, अशा तिखट प्रतिक्रिया भिलवडी परिसरातून व्यक्त होत आहेत.
भिलवडी बाजारपेठ आणि मुख्य रस्ता बेशिस्तपणाच माहेरघर म्हणणे म्हणजे वावग ठरणार नाही. नेहमीच फूटपाथवर अतिक्रमण करून आपलं बस स्थान मांडलेल्या लोकांनी थोडा विचार करण्याची गरज आहे. जर का फुटपाथ मोकळे असते तर लोकांना हम रस्त्यावरून चालण्याची वेळ आली असती का ? हा प्रश्न अनेक लोकांना पडतो आहे. त्यातच काही निर्लज्ज वाहन चालक गर्दीचा विचार न करता भिलवडीच्या मुख्य रस्त्यावरून वेगाने वाहन चालवत असतात. या एका चालकामुळे काही दिवसांपूर्वी शाळेकरी मुलाचा मृत्यू झाला. तर आज मंगळवारीही अपघात झाला एकाला गंभीर इजा झाली. भिलवडी शेजारी असलेल्या खंडोबाच्यावाडीतही अपघात झाला. काही दिवसापूर्वी अपघात होतो, आणि पुन्हा अपघात सत्र सुरू होते. म्हणजे या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला आद्यापही जाग आली नसावी. या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी या बडेजाव करणाऱ्या नेत्यांनी एक तर तटस्थ भूमिका घ्यावी, नाहीतर दोन हात करून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ठोस उपाययोजनांची भूमिका करावी, अशी मागणी भिलवडीतील लोकांतून होत आहे.