डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांच्या सुखवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना ‘श्रमसंस्कार शिबिराचा’ समारोप

दर्पण न्यूज भिलवडी : पुढारी वृत्तसेवा भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांच्या वतीने सुखवाडी ता.पलूस राष्ट्रीय सेवा योजनेचे वतीने ‘श्रमसंस्कार शिबिराचा’ समारोप संपन्न झाला.महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए. एल.जाधव, सरपंच श्री. बाळासाहेब यादव, उपसरपंच सौ. अपर्णा मोहिते, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. भगवान जगताप, स्वच्छतादूत श्री. संभाजी जगताप व बजरंग कोकाटे, मोहन जगताप, अनिल यादव, पोपट जगताप तसेच प्रदीप माने, शेती उद्योजक श्री. महेश जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रूपाली कांबळे, प्रा.शंकरराव पाकले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. पोरे म्हणाले की, महाविद्यालयातील तरुणांना स्वयंशिस्त लागण्यासाठी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले. तसेच ग्राम स्वच्छतेचे एकत्र येऊन केलेले काम कसे सहकार्यात्मक होत असते याचे उत्तम उदाहरण म्हणजेच श्रमसंस्कार शिबिर. राष्ट्रीय सेवा योजनेचा विचार हा लोकांमध्ये सर्वांनी पोहचवावा.