आंबेवाडीतील बौद्ध वसाहतीतील समस्या कायम; समाजमंदिराऐवजी घाणीचे निर्मूलन करा : राजाभाऊ राऊत

दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी संतोष खुणे) :- आंबेवाडी (ता. जि. धाराशिव) येथील दलित वस्तीमध्ये आधीच दोन समाजमंदिरे असताना, तिसऱ्या समाजमंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथे गेल्या २५ वर्षांपासून घाणीचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे समाजमंदिराऐवजी ही समस्या सोडविण्यासाठी निधी वापरण्यात यावा,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देऊन मागणी केली आहे
यावेळी निवेदनात म्हटले आहे की,गावातील दक्षिणेकडील भागात सांडपाणी साचून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचा थेट फटका येथील नागरिकांच्या आरोग्याला बसत असून,नाली आणि रस्त्याची तीव्र आवश्यकता आहे. मात्र, ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे.
बौद्ध बांधवांनी समाजमंदिराची कोणतीही मागणी केली नसताना, सरपंच आणि ग्रामसेवकांनी स्वतःच्या फायद्यासाठी ठराव मंजूर करून जिल्हा परिषदेकडून ७ लाख रुपयांचा निधी समाजमंदिरासाठी घेतला. हा निधी घाण व सांडपाणी समस्येच्या सोडवणुकीसाठी वापरण्यात यावा,
जर यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर जिल्हा परिषदेच्या समोर तीव्र आंदोलन करण्याचां इशारा दिला आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि समाजमंदिराऐवजी प्राथमिक गरज असलेल्या स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर खर्च करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजाभाऊ यानी केली आहे.