आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली दुधोंडी येथे विकासकामांचा धुमधडाका
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र (आप्पा) लाड, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे जे.के.बापू जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

दर्पण न्यूज दुधोंडी :- *महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री मा.आ.डॉ.विश्वजीत कदमसाहेब*,*मा.महेंद्र (आप्पा) लाड, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक* व *कृष्णाकाठ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा.जे.के.बापू जाधव* यांचे उपस्थित *दुधोंडी* गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
१) दुधोंडी येथील नवीन वसाहत (पाण्याच्या टाकी जवळ) येथे नवीन विहीर खुदाई करणे. (१७ लक्ष -१५ वा वित्त आयोग, भूमिपूजन)
२) गाव अंतर्गत बंदिस्त गटार करणे. (२५ लक्ष – १५ वा वित्त आयोग, भूमिपूजन)
३) हनुमान मंदिर येथे सभामंडप बांधणे (१० लक्ष – पतंगराव कदम प्रतिष्ठान व अभिजित कदम मेमोरियल फौंडेशन, पुणे)
४) ग्रामपंचायत मिळकत क्र.६५७ सामाजिक सभागृह बांधणे. (१५ लक्ष – आमदार फंड)
*छत्रपती संभाजी महाराज* यांच्या *पुतळ्याला अभिवादन* करून गावातून *भव्य मिरवणूक काढली*. या वरील विविध कामांच्या उदघाट्न वेळी मानसिंग बँकेचे सुधीर भैय्या जाधव, अंकलखोप गावचे नेते सतीश आबा पाटील, दुधोंडी येथील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व विकास सोसायटी चे पदाधिकारी मान्यवर, माजी सरपंच, जेष्ठ कार्यकर्ते, पत्रकार , युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.