मिरज प्रकल्पांतर्गत मानमोडी व अंकली गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 16 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
दर्पण न्यूज सांगली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पांतर्गत मानमोडी व अंकली या महसूली गावातील अंगणवाडी मदतनिस यांची मानधनी पदे रिक्त आहेत. या पदभरतीसाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून ज्या-त्या स्थानिक गावातील रिक्त अंगणवाडी मदतनीस पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र महिला उमेदवाराने त्यांचे अर्ज दिनांक 16 मे 2025 अखेर पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मिरज कार्यालयात कार्यालयीन वेळेत साक्षांकित प्रतिसह समक्ष पोहोच करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी मिरज यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
गावनिहाय रिक्त मदतनीस पद अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक पुढीलप्रमाणे. मानमोडी – मानमोडी जि.प. शाळेजवळ-184, अंकली – अंकली बौध्दसमाज-136.
अटी व शर्ती – .उमेदवाराचे वय दिनांक 16 मे 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 16 मे 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवाशी असावी. उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. या पदासाठी लहान कुटूंबाची अट लागू राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.