महाराष्ट्र

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता 15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद

पर्यायी मार्ग - पाचवा मैल भिलवडी स्टेशन - चितळे डेअरी - पाटील मळा - वसगडे या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार

     दर्पण न्यूज  सांगली  मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भिलवडी – नांद्रे स्थानकादरम्यान गेट नं. एलसी-119 कि.मी. 256/7-8 येथे भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत बंद करून या रस्त्यावरून होणारी वाहतूक पुढील मार्गावरून वळविण्याबाबत तसेच वाहतूक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

            पर्यायी मार्ग – पाचवा मैल भिलवडी स्टेशन – चितळे डेअरी – पाटील मळा – वसगडे या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. परतीचा मार्ग तोच राहील.

            पर्यायी मार्गावरील वाहतुकीस पुढील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. (१) नमूद ठिकाणी काम चालू करीत असताना जेथे रस्ता सुरु होतो व जेव्हा संपतो अशा ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस ‘काम चालु असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, असे मोठ्या अक्षरातील माहितीदर्शक फलक लावण्यात यावे. (२) रात्रीचे वेळी वाह‌नधारकांना दिसेल असा रस्ता जेथे सुरु होतो व जेथे संपतो अशा ठिकाणी मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक, रेडीयम रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर्स लावण्यात यावेत. (३) ज्या ठिकाणी काम होणार त्या ठिकाणी पर्यायी रस्त्याच्या दोन्ही बाजूस 24 तासांकरीता वरीष्ठ खंड अभियंता, मध्य रेल्वे, भिलवडी / ठेकेदार यांनी त्यांच्याकडील सुरक्षारक्षक नेमावेत. (4) सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूस संपूर्ण रस्त्यावर रात्री विद्युत पुरवठा चालू राहील याची वरीष्ठ खंड अभियंता, मध्य रेल्वे, भिलवडी आणि ठेकेदार यांनी गांभीर्याने दक्षता घेण्याची आहे. (5) वरील ठिकाणी काम चालू असताना अपघात झाल्यास किंवा अन्य काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार वरिष्ठ खंड अभियंता, मध्य रेल्वे, भिलवडी आणि संबंधित ठेकेदार असतील. (6) कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ खंड अभियंता, मध्य रेल्वे, भिलवडी आणि संबंधित ठेकेदार यांनी वरील कामाच्या ठिकाणी स्वतःच्या जबाबदारीवर रेल्वे पोलीस प्रशासनाकडून पोलीस अंमलदार उपलब्ध करून घेण्याचे आहे. (7) वरिष्ठ खंड अभियता, मध्य रेल्वे, भिलवडी / ठेकेदार यांना नमूद ठिकाणी काम करीत असताना स्थानिक पोलीसांची (भिलवडी पोलीस ठाणे) बंदोबस्त कामी गरज भासल्याम आवश्यकतेनुसार त्यांनी योग्य तो शासकीय मेहनताना भरून पोलीस अधिक्षक सांगली यांच्या कार्यालयाकडून अतिरिक्त मनुष्यबळ अपलब्ध करुन घेण्याचे आहे.

            या अटी व शर्तींची अंमलबजावणी होण्याबाबत कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे, मिरज, पोलीस अधिक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांनी दक्षता घ्यावी.

            वरिष्ठ खंड अभियंता, मध्य रेल्वे, भिलवडी यांनी भिलवडी नांद्रे स्थानकांदरम्यान गेट नं. एलसी-119- किमी 256/7-8 येथे भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यात आल्याबाबतची माहिती जनतेला कळविण्यासाठी ग्रामीण व शहरातील महत्वाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी या अधिसूचनेस तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीस व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी. या निर्णयाची तात्काळ प्रभावीपणे व संपूर्णत: अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!