चोर चोर ..! अफवेपासून दूर राहुया, सतर्क राहुया, पोलिसांना सहकार्य करूया..!
आपला सहभाग अन् गस्त योग्यच ; पण गोंधळ, लहान मुले- मुली, महिला अन् ज्येष्ठांचा विचार करूया..!

भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अनेक गावांत होत असलेल्या चोरीमुळे अनेकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पण काही भागात चोर चोर ..! म्हणून अफवा पसरत असल्यास या अफवेपासून आपण दूर राहुयात, सतर्क राहुयात, पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून आपण चांगले सहकार्य करत आहोत आणि यापुढेही सहकार्य करूयात..!
अनेक ठिकाणी आपला सहभाग अन् गस्त योग्यच आहे ; पण काही भागात होत असलेला गोंधळ. यामुळे तेथील लहान मुले- मुली महिला अन् ज्येष्ठांच्या मनांवर होत असल्याच्या परिणामाचा विचार करूयात , आपली एकी आणि नेटकी सामाजिक भूमिका योग्यच आहे, अशा भावना सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहेत.पलूस तालुक्यातील अनेक गावांत आणि भिलवडी परिसरात चोरीचा प्रकाराचा घडत आहे. तर अनेक ठिकाणी अफवा पसरवून गोंधळ घालण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे काही ठिकाणी लहान मुले-मुली आणि महिला अन् ज्येष्ठांच्या मनांवर विपरीत होत आहे, पहा आणि