महाराष्ट्र
करवीर पूर्व पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मालोजी पाटील यांची निवड


कोल्हापूरः अनिल पाटील
करवीर पूर्व पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवाद’चे मालोजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश मसुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी मदन अहिरे तर खजिनदार म्हणून प्रदीप पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी संतोष माने, बाबा नेरले, अनिल निगडे ,राजेंद्र सूर्यवंशी, अनिल उपाध्ये, आनंद गुरव ,मोहन सातपुते, विजय कदम, संजय वर्धन, विशाल फुले ,प्रमोद ढेकणे, राजेंद्र शिंदे ,प्रदीप शिंदे, राहुल मगदूम आदीसह पत्रकार उपस्थित होते.



