महाराष्ट्र
भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट

भिलवडी:सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत घट झाली आहे. काल रात्री पासून दोन ते अडीच फूट पाणी उतरले. ही पाणी पातळी दहा वाजेपर्यंत 40 फुट होण्याची शक्यता आहे.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच पूरपट्ट्यातील लोकांना दिलासा मिळाला आहे.
भिलवडी मुख्य बाजारपेठेजवळून मधला माळवाडीस जाणारा रस्ताही वाहतूकीस सुरू झाला आहे.