भिलवडी येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राचा 25 वा वर्धापन दिन उत्साहात
अध्यक्षस्थानी चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योजक मकरंद चितळे

दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राचा रौप्य महोत्सवी 25 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला समारंभाच्या अध्यक्षस्थानी चितळे उद्योग समूहाचे संचालक मकरंद चितळे होते यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील उपाध्यक्ष मुकुंद तावदर खजिनदार मेजर उत्तम कांबळे सदस्य दिनकर जाधव यांची विशेष उपस्थिती होती प्रारंभि पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामुदायिकपणे म्हणण्यात आली. केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले प्रास्ताविकात 25 वर्षाच्या आपल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेऊन येथून पुढेही उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच वाचन स्पर्धेतील पालवी शेटे अखिलेश विशाल सूर्यवंशी अनन्या घोडके सक्षम पाटील प्रणव दिलीप पाटील या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तके भेट देण्यात आली मकरंद चितळे यांचे हस्ते कुमारी समीक्षा पाटील कुमारी प्रियांका आंबी कुमारी वैष्णवी वावरे या विद्यार्थिनींना यावर्षीची पूज्य साने गुरुजी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली यावेळीकु. अदिती माने हिचा विदेश सत्कार करण्यात आला.यावेळी कुमार पाटील डी आर कदम मेजर उत्तम कांबळे हनुमंत शिंदे ,रोहित रोकडे,जी.जी.पाटील आणि विशाल सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले . संजय गुरव यांनी आभार मानले .सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली याच वेळी साने गुरुजी संस्कार कलश 2025 – 26 याही उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला बाळासाहेब माने गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विद्यार्थी ,पालक, ग्रंथपाल मयुरी नलवडे, वाचनालयाच्या प्रमुख लेखनिक विद्या निकम यांच्यासह अनेक वाचक व मान्यवर उपस्थित होते.