महाराष्ट्र
आमणापूर येथील उमेश पवार यांचे निधन

दर्पण न्यूज पलूस ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील आमणापूर येथील उमेश विष्णू पवार (48)
यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, वडील,भाऊ 3 मुली,एक मुलगा असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवारी 4 जून रोजी आमणापूर येथे होणार आहे.
फिनिक्स कॉम्प्युटर एज्यूकेशन सेंटर या नावाने गेली 25 वर्षांपासून रामानंदनगर येथे कॉम्पुटर सेंटर चालवत होते. अतिशय संयमी, मनमिळावू म्हणून उमेश सरांचा स्वभाव होता. दैनिक तरुण भारत ला पत्रकार म्हणून त्यांनी कार्य केले होते. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी नाव मिळवले आहे.त्यांच्या निधनाने आमणापूर गावात हळहळ व्यक्त होत होती.सारथी एम के सी एल मार्फत देखील त्यांनी कम्प्युटर इन्स्टिट्यूट द्वारे अनेक विद्यार्थी घडवले.