कर्मवीर जयंती स्पर्धेच्या माध्यमिक गटात गीत गायनात जनता विद्यालय येडशी चा प्रथम क्रमांक

दर्पण न्यूज मेडशी ;
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीच्या निमित्ताने माध्यमिक गटाच्या विविध स्पर्धा महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे पार पडल्या या स्पर्धेत जनता विद्यालय येडशी ने उल्लेखनीय यश संपादित केले आहे.
समूह गायनात जनता विद्यालय येडशी चा संघ प्रथम आला. तर रांगोळी स्पर्धांमध्ये कु.स्वराली प्रमोद पवार हीने प्रथम पारितोषिक पटकावले. यावर्षीच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गटाच्या गीत गायन स्पर्धेत जनता विद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था पदाधिकारी, शाळा समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, प्राचार्य श्री नलावडे सर, उपप्राचार्य कांबळे सर व पर्यवेक्षक चव्हाण सर तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.