येडशी येथील जनता विद्यालयात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

दर्पण न्यूज मेडशी ;;
येडशी येथील जनता विद्यालयात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस पी शुगर चे चेअरमन श्री सुरेश पाटील साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यशदा उद्योग समूहाचे चेअरमन सुधीर सस्ते, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री नंदन जी जगदाळे, जनता विद्यालयाच्या शाळा समितीचे चेअरमन राजेंद्र पवार व सहसचिव श्री अरुण देबडवार यांची उपस्थिती होती.
. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय खुल्या व शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन जनता विद्यालयात करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन आज पार पडले. या स्पर्धेत शालेय गटातील जवळपास 105 संघांनी सहभाग नोंदवला असून खुल्या गटातील सांगली, इस्लामपूर, इचलकरंजी, रायगड, कोल्हापूर, पुणे, मावळ, मुंबई उपनगर येथील नामांकित संघांची नोंदणी झाली आहे. दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी या स्पर्धा होणार असून बक्षीस वितरण स्पर्धेनंतर लगेच केले जाणार आहे अशी माहिती स्पर्धा संयोजक प्राचार्य चंद्रकांत नलावडे यांनी दिली.