गङहिंग्लज येथील स्वराज्य हाॅस्पिटलचे ङाँ. अजित वसंतराव पाटोळे व खासगी इसमाला 8 हजाराची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांचा मित्र हा दिनांक 10.1.2025 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चक्कर येऊन खाली पडल्याने, त्याचे डाव्या खुब्यास मार लागल्याने, त्यास दिनांक 11.1.2025 रोजी सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारास दिनांक 13/01/ 2025 रोजी स्वराज्य हॉस्पिटल गडहिंग्लज येथे ऍडमिट केले.तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटोळे यांनी हे ऑपरेशन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचे ठरवून, हे ऑपरेशन शासकीय योजनेतून मोफत करण्याकरीता वीस हजार रुपये द्यावे लागतील, तरच ऑपरेशन होईल असे सांगितले. यातील तक्रारदार यांनी दिनांक 15/01/ 2025 रोजी दहा हजार रुपये डॉ. अजित पाटोळे यांना दिल्यानंतर दिनांक 16/01/2025 रोजी ऑपरेशन केले .
शासकीय योजना व या योजनेअंतर्गत केलेले औषधोपचार हे पूर्णपणे मोफत असताना सुद्धा *या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूने आरोपी अजित वसंतराव पाटोळे वय 49 पद ङाॅक्टर स्वराज्य हाॅस्पीटल गङहिंग्लज जिल्हा. कोल्हापूर. साधना हायस्कूलजवळ संभाजीनगर गङहिंग्लज आणी खासगी इसम इंद्रजीत शिवाजीराव पाटोळेवय 48 पद प्रशासक स्वराज्य हाॅस्पीटल गङहिंग्लज रा. मिसाळ चाळ” आझाद रोङ गङहिंग्लज यांनी तक्रारदार यांच्याकडे 20000/- रुपयेची मागणी करून, तडजोडी अंती18,000 मधील10,000(15/01/2025)रोजी व आज 8000/-रुपये लाच रक्कम आरोपी क्र. 2 याच्याकडे देण्यास सांगितली. ती रक्कम आरोपी क्र 2 यांनी स्वीकारली.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक – श्री बापू साळुंखे
सहा पो. उपनिरीक्षक – सुनील मोरे
पो.हवालदार -सुनील घोसाळकर,
पो. हवालदार- संदीप काशीद,
पो. नाईक-सचिन पाटील
पो.कॉन्स्टेबल-संदीप पवार
चालक सहा. फौज. गजानन कुराडे, यांनी केली.