भारतीय संविधान वाचणे आणि वाचवणे काळाची गरज : शिक्षण नेते भरत रसाळे

कोल्हापूरः अनिल पाटील
: आजच्या काळात भारतीय संविधान
धोक्यात आले आहे. कधीही संविधान बदलले जाऊ शकते असे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोक आम्ही सत्तेत संविधान बदलण्यासाठीच आलो आहोत अशी भाषा करत आहेत. अशा काळात संवेदनशील व जागृत भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन भारतीय संविधान स्वतः वाचणे इतर भारतीयांना वाचायला लावणे आणि सर्वांनी मिळून भारतीय संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिक्षण नेते भरत रसाळे यांनी केले.
ते ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई लिखित भारतीय संविधान का वाचावे? का वाचवावे? या ग्रंथाच्या वाटप प्रसंगी बोलत होते.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, निर्मिती विचारमंच, निर्मिती फिल्म क्लब, निर्मिती व संवाद प्रकाशन, धम्म भवन चारिटेबल ट्रस्ट, आम्ही भारतीय महिला मंच, बालसाहित्य कलामंच यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या विचार जागृतीसाठी विद्यार्थी, युवक, विविध शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था, संघटनांना एक लाख रुपयांचे ग्रंथ वाटप करण्यात आले. त्यातील दीडशे ग्रंथ कोल्हापूर महानगरपालिका खाजगी शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेच्या शिक्षक सभासदांना प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रकाशक अनिल म्हमाने, सदाशिव साळवी, सुबोधकुमार कोल्हटकर, रमेश गंजाळ, विशाल पाटील, कुणाल भालकर, डॉ. शोभा चाळके, अंतिमा कोल्हापूरकर, अनिरुद्ध पाटील, ॲड. करुणा विमल, विश्वासराव तरटे, अर्हंत मिणचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.