देश विदेशमहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात अडकले

         दर्पण न्यूज मिरज /सांगली- : आखाती देशामध्ये उद्भवलेली संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकाच्या सुरक्षिततेबाबत इतर कोणतीही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले होते.

            जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक हे आखाती देशामध्ये अडकले असल्याचे माहिती स्थानिक नागरिकाकडून आजअखेर मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्र (EOC) शी संपर्क साधण्यात आला आहे व सदर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!