टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 रोजी लेडीज टेलर्ससाठी ब्लाऊज वर्कशॉपचे आयोजन : राज्य अध्यक्ष बसवराज पाटील

दर्पण न्यूज सांगली/मिरज :- टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लेडीज टेलर बंधू आणि भगिनींसाठी एक दिवसीय ब्लाऊज वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉप मध्ये गुजरात येथील सुप्रसिद्ध इम्तियाज सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लागणार आहे. या सेमिनारमध्ये कटिंग, फिटिंग, स्टिचिंगसह विविध विषयांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सेमिनार मंगळवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सांगली येथे आहे. जास्तीत जास्त लेडीज टेलर बंधू आणि भगिनींनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील, सचिव शशिकांत कोपार्डे यांनी केले आहे.
राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी सांगितले, की नेहमीच आम्ही टेलर व्यवसायांचा व्यवसाय वाढीसाठी विविध उपक्रम राबवतो या उपक्रमालाही सर्व टेलर बंधू भगिनींचा भरभरून असा प्रतिसाद मिळतो आहे. दिनांक 5 रोजी आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये विविध कलेचे पैलू आपणास शिकता येणार आहेत. हे सेमिनार फक्त 300/- रुपयांमध्ये आहे. यामध्ये AC हॉल – रिफ्रेशमेन्टसह, लाइव्ह स्क्रीन वर प्रेझेंटेशन असणार आहे. कॉम्प्लेमेंटरी सिगार पँट कटिंगचेही मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सभासद करून घेतले जातील. सेमिनार मंगळवार, दि. 05/08/2025, वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून
ठिकाण : हॉटेल देवगिरी, मार्केट यार्ड समोर, नॅचरल आईस्क्रीमच्या शेजारी, सांगली येथे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क :- शहाबाज झारी – 9923235812,विद्या जाधव – 8624003584,गिता सुतार – 9850724196, निकीता सोलंकी – 9923434334, अनिसा निपाने 9923371244,
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे.