महाराष्ट्रराजकीय

मानसिंग को-ऑप बँक शाखा पलूस येथे गायत्री पीठ हंपी चे परमपूज्य श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामी यांची सदिच्छा भेट

 

दर्पण न्यूज पलूस :-

मानसिंग को-ऑप बँक शाखा पलुस येथेगायत्री पीठ हंपी चे सर्वेसर्वा *परमपूज्य श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामी* यांनी बँकेस सदिच्छा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात अध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
यावेळी त्यांच्यासोबत
अरुणराव वरुडे देवांग समाज राष्ट्रीय अध्यक्ष,
प्रा. नारायण उंटवाले संस्थापक विश्वशांती देवांग फाउंडेशन, तसेच स्वामीजींचे सेवक कीर्तीजी, सुभाष कवडे, उत्तमराव चोथे, विष्णु रोकडे उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांचा सत्कार
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा. जे. के. (बापू) जाधव,
मानसिंग को-ऑप बँकेचे चेअरमन मा. सुधीर (भैय्या) जाधव,
तसेच बँकेच्या संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी माजी व्हा. चेअरमन शीतल सावळवाडे, संचालक हनीफ मुजावर, अमृत नलवडे, महादेव रानमाळे, अनिल शेवाळे, अजित सूर्यवंशी, माजी संचालक महालिंग राजमाने, प्रमोद सगरे, पत्रकार अभिजीत रांजणे,सागर ढवळे, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मॅनेजर हणमंत महाडीक तसेच बँकेचे कर्मचारी, सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर सामाजिक बांधिलकी, अध्यात्मिक मूल्ये आणि सहकार चळवळीचा संगम दर्शवणारा एक संस्मरणीय क्षण ठरला.

*मानसिंग बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून समाजाशी नाळ जुळवून कार्य करणारी एक जबाबदार सहकारी चळवळ आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!