महाराष्ट्रसामाजिक

भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

 

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक रमेश चोपडे आणि वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी रमेश चोपडे सर यांनी शिवरायांच्या जीवनावर स्वतः लिहिलेला पोवाडा सादर केला. इयत्ता तिसरीतील वेदश्री अविनाश निकम हिने शिवरायांच्या जीवनावर लिहिलेली कविता प्रभावीपणे सादर केली गिरीश चितळे यांनी शिवरायांच्या जीवन कार्यातील मूल्ये अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त केले स्वागत प्रास्ताविक व आभार कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले संयोजन मयुरी नलवडे विद्या निकम व माधव काटीकर यांनी केले यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी वाचक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!