महाराष्ट्र

अमरावती येथे खाटीक समाज परिवर्तन संघटनेतर्फे उपवर युवक-युवती परिचय मेळावा, सत्कार समारंभ उत्साहात

 

 

अमरावती(प्रतिनिधी):- खाटीक समाज परिवर्तन संघटनेतर्फे स्थानिक चिंतामणी पॅलेस अमरावती येथे शनिवार दिनांक २८/१२/२०२४रोजी समाजातील उपवर युवक-युवती परिचय मेळावा व मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजभूषण डॉ.संतुजी लाड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारार्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्रीकृष्ण कंटाळे कार्याध्यक्ष,उद्घाटक खा.डॉ.अनिल बोंडे व सत्कार मूर्ती आ.गजानन लवटे हे होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन नेहर तर प्रास्ताविक प्रिया नेहर यांनी केले या मेळाव्यात एकूण उपवर ९७युवक व ३२युवती यांची नोंद करण्यात आली सर्व विवाहोत्सुक युवक-युवती यांचा बायोडाटा वाचून दाखविण्यात आला तसेच काहींनी आपला परिचय स्वतः मंचावर येऊन दिला उपस्थित सर्व युवक-युवती,पालक यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.आ.गजानन लवटे यांचा खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या सर्व शाखांतर्फे पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गजानन लवटे यांनी आपल्या भाषणात संघटनेचे कौतुक करून संघटनेला योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच डॉ.अनिल बोंडे यांनी. आर्थिक विकास महामंडळाचे फायदे समाजास आपल्या भाषणातून पटवून दिले तसेच खाटीक समाज सभागृहाच्या कंपाउंड वॉलसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय माहुरकर-शहराध्यक्ष,विजय हरणे-उपकार्याध्यक्ष,माणिक नेहर-उपाध्यक्ष,सुरेश माहुरे-उपाध्यक्ष,प्रमोद हरणे-उपाध्यक्ष,सतीश माहूरे-सहसचिव,रामेश्वर माहुरकर-कोषाध्यक्ष,शालिकराम कंटाळे-सहकोषाध्यक्ष,सुभाषराव लोणारे-सल्लागार,विजय धनाडे- प्रसिद्धी प्रमुख,मनोहर पारवे-सल्लागार,भास्कर माहूरकर-संघटक,दीपक धनाडे-संघटक,प्रवीण माहूरे- संघटक,उमेश डोईफोडे-संघटक,प्रशांत विरेकर-सदस्य,सुधाकर कंटाळे-सदस्य,महेंद्र विल्हेकर-सदस्य, शंकर मंडवे-सदस्य,जितू घनगोरकर-सदस्य,संतोष रावेकर-शाखा अध्यक्ष,मोहन पारवे-शाखा अध्यक्ष,रामभाऊ माकोडे -शाखा अध्यक्ष,प्रकाश नेहर-शाखा अध्यक्ष,प्रिया नेहर-महिला अध्यक्ष,अरुणा माहुरे-महिला उपाध्यक्ष,रीना विरेकर-शाखा अध्यक्ष,शारदा पारवे-शाखा अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!