महाराष्ट्र

ज्ञानाची अनुभूती मिळण्यासाठी चौफेर वाचन आवश्यक : जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे

सांगली येथे सामुहिक वाचनाचा कार्यक्रम’ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात संपन्न

 

 

            सांगली  : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली या कार्यालयाने नवीन वर्षाचे सुरुवात या ग्रंथालयाचे वाचक सभासद व विद्यार्थांच्या आवडीनुसार पुस्तकांच्या एक तासाच्या वाचनाने ‘सामुहिक वाचनाचा कार्यक्रम’ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वाचनकक्षामध्ये संपन्न झाला. शहाणपण व ज्ञानाची अनुभूती मिळण्यासाठी चौफेर व सर्वांगिण वाचन करा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी यावेळी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी आवडीच्या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी व वाचक सभासदांना ‘शांतता सांगलीकर वाचत आहेत’ या सामुहिक वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमामध्ये आवाहन केले होते. त्यानुसार आवडीच्या पुस्तकाचे वाचन या सामुहिक वाचनाच्या कार्यक्रमामध्ये सुमारे 45 ते 50 विद्यार्थी व वाचक सभासदांनी सहभाग नोंदविला.

सुरुवातीस अमित सोनवणे यांनी ‘सामुहिक वाचन’ या संकल्पनाची माहिती उपस्थितांना देवून त्यांच्या आवडीचे पुस्तक शासकीय ग्रंथालयातील ग्रंथ संग्रहातून घेण्यास विद्यार्थी व वाचक सभासदांना परवानगी दिली. त्याप्रमाणे त्यांना आवडलेल्या पुस्तकांची प्रत घेवून विद्यार्थी व वाचक सभासद वाचन कक्षामध्ये सामुहिक वाचनासाठी उपस्थित राहिले. त्यानंतर नियोजनाप्रमाणे अमित सोनवणे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी वाचक व कर्मचारी यांना ‘शांतता सांगलीकर वाचत आहेत’ या आवडलेले पुस्तक वाचनाच्या सामुहिक वाचन कार्यक्रमामध्ये स्वागत करुन प्रत्यक्ष या कार्यक्रमास सुरुवात केली.

अत्यंत शांततामय व प्रसन्न वातावरणात जवळपास 1 तास 15 मिनिटे सामुहिक वाचनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यार्थी, वाचक सभासद व कर्मचारी अगदी बसलेल्या जागेवरुन न हलता तल्लीन होऊन पुस्तक वाचनामध्ये मग्न झालेले होते. त्यामुळे सामुहिक वाचनाचा एक तासाचा सव्वातास केव्हा संपला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. त्याचा परिणाम म्हणून सदर कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित काही विद्यार्थ्यांनी तात्काळ पुस्तके मिळण्यासाठी शासकीय ग्रंथालयामध्ये सभासदाची नोंदणी केली. यातून या कार्यक्रमाची परिणामकारता दिसून आली.

शेवटी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी सामुहिक वाचनाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, ग्रंथालयाचे वाचक सभासद व कर्मचारी यांनी भरघोस प्रतिसाद देवून हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.  तसेच वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी दि. 15 जानेवारी, 2025 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’ आणि ‘वाचक व लेखक संवाद’ या कार्यक्रमांनाही भरघोस प्रतिसाद देण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!