महाराष्ट्र
सांगली जिल्हा तलाठी पदांसाठीची निवड, प्रतिक्षा यादी प्रसिध्द

सांगली : सांगली जिल्ह्यातील एकूण 110 तलाठी पदांसाठी शासनातर्फे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 108 पदांसाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा प्रशासनाच्या sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती (माजी सैनिक) पदासाठी उमेदवार न मिळाल्याने दोन पदे रिक्त आहेत. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकामी सूचनापत्र निर्गमित करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.