महाराष्ट्रराजकीय

कुंडल जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या : पालकमंत्री.चंद्रकांत पाटील

कुंडल जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू-भगिनींशी संवाद; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज पलूस/ कुंडल -: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी आज पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलूस तालुक्यातील कुंडल व दुधोंडी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू-भगिनींशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी  संवाद साधला.

देशातील २५ कोटी दारिद्र्यरेषेखालील लोकांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दारिद्र्यरेषेच्या वर आणले असून गरिबातल्या गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून विकासाचा चौफेर आराखडा प्रत्यक्ष कृतीत आणला आहे, त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करून भाजपाच्या विकासवाटेला साथ देणे ही आज काळाची गरज आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावातील गल्लीबोळातील रस्त्यांपासून ते गटारींपर्यंतची सर्व कामे अत्यंत प्राधान्याने आणि खेड्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्यातील भाजपा महायुती सरकार काम करत आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा हा रथ असाच वेगाने पुढे नेण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना पुन्हा प्रभावीपणे राबवण्यासाठी ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाला भरघोस मतदान करण्याचे आवाहन मंत्री मा. चंद्रकांत दादांनी यावेळी केले. या वेळी माझ्यासहित मा. आ. पृथ्वीराज बाबा देशमुख, मा. शरद भाऊ लाड, मा. विलास काळेबाग आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!