काँग्रेस पक्षाचे कुंडल मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन ; दिग्गज नेत्यांसह, लोकांचा मोठा सहभाग


दर्पण न्यूज पलूस/ कुंडल :- काँग्रेस पक्षाचे कुंडल जिल्हा परिषद गटातील उमेदवार, काँग्रेस पक्षाचे कुंडल पंचायत समिती गणातील उमेदवार यांना निवडून देण्यासाठी कुंडल मध्ये भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम, महेंद्र आप्पा लाड यांच्या यांच्यासह दिग्गज नेते मंडळीची उपस्थिती होती.
काँग्रेस पक्षाकडून कुंडल जिल्हा परिषद गटातून ऋषीकेश महेंद्रआप्पा लाड, कुंडल पंचायत समिती गणातून हेमा सुहास पवार-पाटील, बांबवडे पंचायत समिती गणामधून सुवर्णा पांडुरंग संकपाळ हे निवडणुकीसाठी उभे आहेत. या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कुंडल जिल्हा परिषद गट, कुंडल पंचायत समिती गण, बांबवडे पंचायत समिती गणातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



