पीआरसीआयतर्फे “सर्वोत्कृष्ट सचिव 2024” पुरस्काराने निखिल वाघ सन्मानित

मुंबई : PRCI गोवा चॅप्टरचे सचिव निखिल वाघ यांना पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (PRCI) द्वारे “वर्ष 2024 चे सर्वोत्कृष्ट सचिव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळूर येथे हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा पार पडला आणि त्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. निखिल वाघ यांच्या जनसंपर्क आणि प्रशासनातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारचे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
स्वीजल फुर्ताडो, मिस ग्लोबल इंडिया 2024, पीआरसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती. गीता शंकर आणि पीआरसीआयचे मेंटर श्री एम.बी. जयराम, या सर्वांनी निखिल वाघचे PRCI गोवा चॅप्टरमधील समर्पण, व्यावसायिकता आणि प्रभावी कामाबद्दल कौतुक केले.
विशेष म्हणजे निखिल वाघ यांची या पुरस्कारासाठी भारतभरातील ५९ PRCI विभागातील सचिवांमधून निवड करण्यात आली. अध्यक्ष श्री दीपक नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली, PRCI गोवा चॅप्टर उत्कृष्ट कार्य करत आहे, गोव्यातील जनसंपर्क क्षेत्रात लक्षणीय कार्य करत आहे. निखिल वाघ यांच्या योगदानाची दखल ही यानिमित्ताने राष्ट्र स्तरावर घेतली
असल्यामुळे पीआरसीआय गोवा चॅप्टरचे अध्यक्ष दीपक नार्वेकर आणि उपाध्यक्ष श्री वामन प्रभू आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सचिव निखिल वाघ यांचे अभिनंदन केले.