कृषी व व्यापारमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी रब्बीपिक स्पर्धा योजनेत सहभाग घ्यावा ; पूनम जाधव

 

 

पलूस ; महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेमार्फत रब्बी हंगाम सन 2024 – 25 मध्ये रब्बी गहू व हरभरा पिकाची स्पर्धा आयोजित केले असून त्यात सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 आहे तरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस कार्यक्षेत्रातील वसगडे, माळवाडी, बुरुंगवाडी,हजारवाडी, खंडोबाचीवाडी गावातील गहू व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन पूनम जाधव कृषी सहाय्यक यांनी केले.
राज्यात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रकारचे विविध भागात वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी मिळवलेल्या उत्पादकतेत प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखीन उमेदीने नवनवीन अद्यवत तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्याकडून केला जातो हा उद्देश ठेवून राज्यातर्गत स्पर्धा तालुका जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येते यानुसार कृषी विभागामार्फत चालू रब्बी हांगमामध्ये पलूस तालुक्यामध्ये रब्बी गहू व हरभरा या पिकाची स्पर्धा राबविण्यात येणार आहे तरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची नावावर जमीन असणे व ती तो स्वतः करत असणे आवश्यक आहे पीक स्पर्धेत सहभागी लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 40 गुंठे क्षेत्र सलग लागवड असणे आवश्यक आहे
*पीक स्पर्धेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*
विहित नमुन्यातील अर्ज,
ठरवून दिलेले शुल्क भरल्याचे चलन,
7/12 व 8 अ चा उतारा,
बँक पासबुक झेरॉक्स,
आधार कार्ड झेरॉक्स
एक स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी रुपये 300/- तरी कृषी विभाग मार्फत पिक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!