महाराष्ट्र
शासकीय अपंग शाळा मिरज येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात
सांगली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने शासकीय अपंग शाळा मिरज येथे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा हक्क व त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांग व्यक्तींच्या हक्काविषयी मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती गौरी पोतदार यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विजय कोंगनोळे यांनी केले. आभार श्री. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.