महाराष्ट्र
सार्वजनिक वाचनालय भिलवडी’ येथे ‘सहावा सखी वाचन कट्टा’ उत्साहात
![](https://darpannews.co.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241207-WA0019.jpg)
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी ‘सार्वजनिक वाचनालय भिलवडी’ येथे ‘सहावा सखी वाचन कट्टा’ उत्साहात झाला. सौ. प्रिया वाळवेकर या प्रमुख पाहुण्या तर सौ.अर्चना किणीकर या अध्यक्षा म्हणून लाभल्या.
कोणत्याही’वर्तमानपत्रातील माझे वाचन’ या विषयावर सखींनी आपले विचार मांडायचे होते. सर्वच सखींनी अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडले.
सदर कार्यक्रमाचे संयोजन सौ. प्राजक्ता प्रमोद कुलकर्णी यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता प्रसाद कुलकर्णी यांनी केले. आभार सौ. मीनाक्षी चौगुले यांनी मानले. वाचनालयाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक मा.श्री. गिरीश चितळे यांचे सहकार्य लाभले. या वाचन कट्ट्यास वाचनालयाचे सचिव श्री. सुभाष कवडे सर आणि वाचनालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.