डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ

पलूस : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदम दादा यांच्या अध्यक्षतेखाली व आ. डॉ विश्वजीत पतंगराव कदम साहेब (माजी मंत्री) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला._*
_डॉ.पतंगरावजी कदम साहेब व आ. मोहनराव (दादा) कदम यांच्या अथक प्रयत्नातून या कारखान्याची उभारणी झाली. गळीत हंगामाच्या निमित्ताने बोलताना आ. डॉ विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांनी ज्या शेतकऱ्यांची शेअर्स रक्कम अपूर्ण आहे. त्या सर्वाना सभासद साखर कार्ड वितरण करण्याच्या सूचना कारखाना प्रशासनाला दिल्या._ *_यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.जालिंदर बापू महाडिक, संचालक श्री.रघुनाथराव कदम काका, श्री.शांताराम बापू कदम, भारती बँकेचे संचालक डॉ.जितेश भैय्या कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे व्हा.चेअरमन महेश काका कदम, कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.एस. एफ. कदम उपस्थित होते.