महाराष्ट्रराजकीय
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 14 नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .
कार्यवाहक सुभाष कवडे यांनी स्वागत प्रास्ताविक करून नेहरूजींच्या कार्याचा संक्षिप्त परिचय सांगितला .यावेळी विश्वस्त जी. जी. पाटील ग्रंथपाल वामन काटीकर सौ विद्या निकम सौ मयुरी नलवडे तसेच शालेय विद्यार्थी वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते. संयोजन माधव काटिकर यांनी केले.