सर्वांचे प्रेम, विश्वास, आशीर्वाद हीच माझी खरी ताकद : डॉ विश्वजीत कदम
बोरजाईनगर, विठ्ठलवाडी व आमणापूर येथे प्रचाराला नागरिक, महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद

पलूस; पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी बोरजाईनगर, विठ्ठलवाडी व आमणापूर येथे प्रचार दौरा केला . या प्रचाराला नागरिक, महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही ठिकाणी पक्ष प्रवेश झाले.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास व आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करून विकासाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची विचारधारा पुढे नेत सर्वसामान्य जनता व अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडविले आहेत. यापुढेही जनतेची अविरत सेवा करीत राहीन. आपल्या पलूस-कडेगाव तालुक्याचा गतिमान सर्वांगीण विकास करून देशात एक नंबरचा विकसित मतदारसंघ बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी २० नोव्हेंबरला ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची व अस्मितेची लढाई आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या लोकसेवेची पंचसूत्री व जाहीरनाम्यातून नवा प्रगत महाराष्ट्र घडविण्याचा व सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा, दीन-दलित, शेतकरी व तरुणांचे प्रश्न सोडविण्यास महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च प्राधान्य देईल, असा विश्वास डॉ विश्वजीत कदम यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, युवा नेते सतीश आबा पाटील, विविध गावांतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.