महाराष्ट्रराजकीय
डॉ विश्वजीत कदम हेच मागासवर्गीय समाजाला न्याय देणार : डॉ सुशील गोतपागर

भिलवडी :- पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉ विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रचारार्थ भिलवडी ,माळवाडी परिसरात दलित मागासवर्गीय समाजात मॅरेथॉन बैठकांचे आयोजन..
डॉ विश्वजीत कदम साहेब हेच सर्व समाजाचा विकास करू शकतात व न्याय देऊ शकतात.
असे मत सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.सुशील गोतपागर यांनी व्यक्त केले.म्हणूनच डॉ.विश्वजीत कदम यांचे मागे समाजाने ठाम राहावे असे सर्वांनुमते या बैठकीत निर्णय झाले.यावेळी महासचिव सूरज मिसाळ, विजय कांबळे,आप्पा गस्ते,शंकर सदामते,प्रशांत सदामते,सुशांत सदामते,दयानंद वायदंडे,प्रशांत बागडी,विशाल मोरे,विशाल कांबळे,शंकर मोरे व भिलवडी माळवाडी परिसरातील कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते..