गुगवाडमधील धम्मभूमी वर्धापनदिनानिमित्त 12 रोजी धम्म परिषदेचे आयोजन : उद्योगपती सी आर सांगलीकर

सांगली : –
गुगवाड (ता. जत) येथे अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित धम्मभूमि बौद्ध विहार द्वितीय वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी दिली. मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी धम्मभूमि वर्धापनदिनासह धम्म परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी गुगवाड (ता. जत) येथे स्वखर्चातून सुमारे २० एकर परिसरात धम्मभूमिची उभारणी केली आहे. शंभर बाय शंभर चौरस फूट क्षेत्रामध्ये अत्यंत देखणी अशी दुमजली इमारत उभारली आहे. इमारतीवर चाळीस बाय चाळीस असा आकर्षक स्तूप १६ कॉलमच्या आधारावर उभारला आहे. खालच्या मजल्यावर तीन फुटाच्या चबुतºयावर १२ फूट उंचीची थायलंडवरून आणलेली १२ फूट उंचीची आकर्षक भगवान गौतम बुद्ध यांची बैठी मूर्ती आहे. धम्मभूमि परिसरात विविध वनऔषधी, विविध फुलांची हजारो झाडे लावली आहेत. वनराईमुळे हा परिसर हिरवाईने फुलून गेला आहे. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी धम्मभूमि बौद्ध विहारचे लोकार्पण करण्यात आले. आत्तापर्यंत हजारो बौद्ध उपासक, उपासिका, भदंन्त यांनी धम्मभूमिला भेट दिली आहे. अल्पावधीतच जत तालुक्यातील धार्मिक तसेच पर्यटनस्थळ म्हणून गुगवाडमधील धम्मभूमि नावारूपास आली आहे. अनेक श्रामणेर शिबिर येथे पार पडली आहेत. मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी धम्मभूमि बौद्ध विहार वर्धापनदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त धम्म परिषद होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजून ३० वाजता अथर्व चंद्रकांत सांगलीकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज गुगवाड येथे धम्म ध्वजारोहण होत आहे. भदंन्त प्रज्ञाबोधी यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होणार आहे. सकाळी ८ वाजून ३५ वाजता बुद्धमूर्ती पुजा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भिक्खू संघाच्या हस्ते अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी धम्म रॅलीस प्रारंभ होणार आहे. धम्मभूमि येथे सकाळी ९ वाजून ४० वाजता भदंन्त डॉ. यशकाश्यपायन महास्थविर यांच्या हस्ते भिक्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मध्वज वंदना होणार आहे. महार बटालियन जवानांकडून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजून ४५ वाजता बोधीवृक्ष वंदना भिक्खू संघ यांच्या हस्ते होईल. सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी भिक्खू संघ यांच्या हस्ते धम्म परिषद उदघाटन होईल. दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी भदंन्त डॉ. यशकाश्यपायन महास्थविर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिभा पूजन, दुपारी १२ वाजून ३० वाजता बालक उपासक, उपासिका संघ यांचे स्वागत गीत, १२ वाजून ४५ क्षमा याचना, दुपारी १२ वाजून ४५ वाजता स्वागत व प्रास्ताविक उद्योगपती सी.आर. सांगलीकर साहेब करणार आहेत. भिक्खू संघ यांच्या हस्ते दीक्षा समारंभ, उद्योगपती सी.आर. सांगलीकर व अपूर्वा सांगलीकर हे २२ प्रतिज्ञा वाचन करणार आहेत. दुपारी १ वाजून ३० ते ४ वाजून ३० भदंन्त डॉ. डॉ. यशकाश्यपायन महास्थविर (जयसिंगपूर), भदंन्त एस. संबोधी (वसगडे), भदंन्त ज्ञानज्योती (गुगवाड), भदंन्त प्रज्ञाबोधी (तेरदाळ), भदंन्त आर. आनंद थेरो (वसगडे), भदंन्त गोविंदो मानदो (गुगवाड), भदंन्त धम्मदीप (इचलकरंजी), श्रामनेर विजय (इचलकरंजी) यांची धम्मदेसना होणार आहे. प्रा. गौतमीपुत्र कांबळे (सांगली) हे बौद्ध धम्माचा ºहास कारणे व भवितव्य, प्रा. अशोक भटकर (सांगली) हे बौद्ध धम्माच्या प्रसाराचे उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. धम्म परिषदेतील ठरावाचे वाचन उद्योगपती सी.आर. सांगलीकर करणार आहेत. सायं. ४ वाजून ४५ वाजता धम्मपालन गाथा, सायंकाळी ५ वाजता चिवरदान व आभार असे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. धम्मभूमि वर्धापनदिन तसेच धम्म परिषदेस उपासक, उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धम्मभूमिचे संस्थापक, उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी केले आहे.