पलूस शहराचा सर्वांगीण विकास जोमाने करणार : उमेदवार डॉ विश्वजीत कदम
डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचाराला पलूस शहरातील म्हाडा कॉलनी, श्रीराम बाजार, सुमन प्लाझा अपार्टमेंट, कन्या शाळा रोड, इनामपट्टा भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

पलूस:-
पलूस शहराचा सर्वांगीण विकास जोमाने करणार , असे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
पलूस येथील निवडणुकीच्या प्रचाराला पलूस शहरातील म्हाडा कॉलनी, श्रीराम बाजार, सुमन प्लाझा अपार्टमेंट, कन्या शाळा रोड, इनामपट्टा भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या भागात डॉ विश्वजीत कदम यांचे नागरिकांनी व माता-भगिनी यांनी जोरदार स्वागत केले .
डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, पलूस शहर व परिसरात विविध विकासात्मक कामे केली. पलूस-कडेगाव शहराला विकसित करणे तसेच स्मार्ट सिटी बनवण्याचे ध्येय आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने मला विजयी करा. तुम्ही आजवर मला मोलाची साथ दिली. यापुढील काळातही आपल्या पलूस-कडेगावला आणखी समृद्ध करण्यासाठी अशीच भक्कम साथ व आशीर्वाद द्या.
यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, काँग्रेस पक्षाचे युवा नेते सतीश आबा पाटील तसेच काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते , महिला , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.