धनगाव, बुरूंगवाडी, हजारवाडी, भिलवडी स्टेशन येथील नागरिकांच्या पाठीशी राहून सहकार्य करणार; डॉ विश्वजीत कदम
धनगाव, बुरूंगवाडी, हजारवाडी, भिलवडी स्टेशन येथील प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भिलवडी (मुख्य संपादक अभिजीत रांजणे)
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ धनगाव, बुरुंगवाडी, हजारवाडी , भिलवडी स्टेशन येथे भेट दिली . या भागातील नागरिकांना सर्व सहकार्य करणार, असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, जनसेवेसाठी सदैव तत्पर असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कधीही कमी पडणार नाही,. २० नोव्हेंबरला ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करा, असे सांगितले.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात केले. माय-भगिनींनी प्रेमपूर्वक औक्षण करत आशीर्वाद दिले . स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांपासून आमच्या कदम कुटुंबीयांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या लोकांना पाहून धन्य झालो.
बुरूंगवाडी येथे काँग्रेस पक्षाचे युवा नेते सतीश आबा पाटील यांनी स्व पतंगराव कदम साहेब यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच डॉ विश्वजीत कदम यांनी मतदार संघात केलेल्या कामाचा आढावा एक अत्यंत अभ्यासपूर्ण घेतला. येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक मतदानावेळी आपण आपलं मोलाचं मत डॉ विश्वजीत कदम यांच्या हाताला द्यावे, असे आवाहन सतीश आबा पाटील यांनी केले.
धनगाव येथील ग्रामदैवत श्री हनुमानाचे मनोभावे दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन केले. तसेच बुरुंगवाडी येथील प.पू. ब्रह्मानंद महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सहकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, हजारवाडी येथे पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी लक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन नागरिक, महिलांना मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत मी सामान्य माणसाला न्याय देणार आणि अडीअडचणी समजून घेणार, असे डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.