माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करणार : डॉ विश्वजीत कदम
खटाव, ब्राह्यनाळ येथे जंगी स्वागत ,; प्रचाराला आणि बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
भिलवडी (मुख्य संपादक अभिजीत रांजणे):
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी ब्रम्हनाळ निवडणुकीच्या प्रचारार्थ खटाव व ब्रह्मनाळ येथे भेट दिली .
यावेळी ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन जनतेच्या सेवेसाठी आणखी बळ दे, अशी प्रार्थना केली. ज्येष्ठ नागरिक व माता-भगिनींचे आशीर्वाद घेतले. ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी आपुलकीने केलेल्या भव्य स्वागतामुळे डॉ विश्वजीत कदम भारावून गेले.
डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, ‘काम हेच कर्तव्य’ समजून मी पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र काम करत आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, विश्वास व पाठिंबा याच्या जोरावर मतदारसंघासाठी भरघोस निधी आणून विकासकामं करू शकलो. ‘आपला माणूस’ म्हणून तुम्ही मला सदैव भरपूर प्रेम दिलं याची मला जाण आहे. हीच आपुलकी व जिव्हाळ्याचं नातं असंच कायम ठेवून येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करून पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे, असे काँग्रेसचे नेते डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, युवानेते सतीश आबा पाटील, खटाव चे सरपंच ओंकार पाटील, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते, ब्रम्हनाळ चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.