कोल्हापूरातील महिला पोलिस काॅन्स्टेबल काजल गणेश लोंढे हिला दोन हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरःअनिल पाटील
तक्रारदार यांनी त्यांचे घरगूती कारणावरून त्यांच्या पत्नीच्या विरूद्ध महीला सहाय्यक कक्ष पोलिस अधिक्षक कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दिलेला होता तो अर्ज निकाली काढला व निकाली काढलेल्या अर्जाचे समजपत्र तक्रारदार यानां देण्यासाठी काजल गणेश लोंढे महीला पोलिस काँस्टेबल ब. नं 217 नेमणूक महीला कक्ष” पोलिस अधिक्षक कार्यालय कोल्हापूर वर्ग—3 बंगला नं 10 पार्वती कन्ट्रक्शन’ सरनोबतवाङी. ता. करवीर यांनी त्यांच्याकङे दोन हजार रूपये लाचेची मागणी केली होती. ती लाच स्विकारतानां आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकङले.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.दतात्रय पूजारी”” स.पो.फो प्रकाश भंङारे””पो.हे. काँ.अजय चव्हाण”” विकास माने “पो.ना. सचीन पाटील “म.पो.ना संगीता गावङे”” म.पो.काँ पूनम पाटील आदीनीं सापळा रचून केली.