विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करावा : कथाकथनकार हिंमत पाटील
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत पारितोषिक वितरण समारंभ ; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती



दर्पण न्यूज पलूस/भिलवडी :-विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करावा.वाचनातून माणूस घडतो.मोबाईल मध्ये हरविलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी खाजगी मराठी प्राथमिक शाळा पुढाकार घेते ,ही बाब निश्चित प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचे काम शाळा करीत असतात. विद्यार्थ्यांच्या जडघडणीत प्राथमिक शाळांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन कथाकथनकार हिंमत पाटील यांनी व्यक्त केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ.सुहास जोशी होते.
विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करावा.विविध उपक्रमात,स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.खाजगी मराठी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन डॉ.सुहास जोशी यांनी केले.
यावेळी हिंमत पाटील यांनी सादर केलेल्या कथाकथन कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हस्तकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बालकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शाळेचे पालक व अरिहंत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शीतल किणीकर यांनी शाळेस दोन स्मार्ट टी. व्ही.संच भेट दिले.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे, विश्वस्त अशोक चौगुले, संचालक महावीर वठारे,चंद्रकांत पाटील, संभाजी सूर्यवंशी, प्रा.अजित चौगुले, सदाशिव तावदर, संस्थेचे सचिव मानसिंग हाके, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे, प्रा.जी.एस.साळुंखे, प्रा.महेश पाटील, शंकर बल्लाळ, सौ.सुचेता कुलकर्णी, सौ.अनिता रांजणे,सौ. छाया गायकवाड, प्रवीण गुरव,रोहित नलवडे,रोहित रोकडे, धनंजय साळुंखे,दिलावर डांगे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले. शरद जाधव व सौ.प्रगती भोसले यांनी सूत्रसंचालन केले.संजय पाटील यांनी आभार मानले.



