महाराष्ट्रराजकीय
जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये माजी उपमहापौर देवमाने यांची घरवापसी


दर्पण न्यूज मिरज/सांगली :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेले सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये घरवापसी केली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते त्यांनी पुन्हा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे. समित कदम यांना आनंदा देवमाने यांची नाराजी दूर करण्यात यश मिळाले असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्ष ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचे समित कदम यांनी सांगितले.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव कुरणे, समीर मालगावे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.



