आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अंकलखोप येथे ८५ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी

दर्पण न्यूज.भिलवडी :
अंकलखोप ता. पलूस येथे डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. उद्घाटन अंकलखोप काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम सूर्यवंशी व सरपंच राजेश्वरी सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबीरास प्रारंभ करण्यात आला. डॉ. इंद्रजीत शिंदे यांनी नेत्र विभागातील विविध योजना व शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली. या शिबिरात एकूण ८५ रूग्णांची तपासणी करण्यात आली. एकूण १० रूग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी भारती हॉस्पिटल सांगलीला नेले. यावेळी सांगली कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, उदयसिंह सूर्यवंशी, प्रदीप पाटील, एम.के. चौगुले, हणमंत पाटील, उमेश पाटील, समीर पाटील उपस्थित होते. शिबिरासाठी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, नेत्र विभाग प्रमुख डॉ. राजेश गोटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.