मिरज येथील उरसानिमित्त कव्वालीच्या कार्यक्रमास मिरज हायस्कूल क्रीडांगण मिळावे : महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची मागणी

मिरज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय ओहळ साहेबना दिले निवेदन मिरज उरसानिमित्त कव्वालीचा कार्यक्रम घेणार महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख महापालिके कडे मिरज हायस्कूल ग्राउंडची केली मागणी
मिरज : मिरज येथील उरूसाला 5/2/ 2024 रोजी सुरुवात होणार आहे .महाराष्ट्र रिपब्लिकन युवक तर्फे कव्वालीचे दी 7/2/2024 रोजी आयोजन करण्याचे ठरवलेले असून किमान कार्यक्रमाच्या अगोदर दोन ते तीन दिवस ग्राउंड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांचे नेतृत्वाखाली मिरज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संजय ओहळ साहेबची चर्चा करून निवेदन दिले सविस्तर माहिती देऊन ग्राउंडची मागणी केली.
महापालिकेने मिरज हायस्कूल ग्राउंड हा कव्वालीसाठी मोफत किंवा कमीत कमी शुल्क आकारणी करून उपलब्ध करून द्यावे कारण हजरत खाजा शमणा-मीरा हे जागृत देवस्थान असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक देखील आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून हिंदू मुस्लिम दर्शन घेण्यासाठी भक्त येत असतात गेल्या अनेक वर्षा पासून मिरज शहरांमध्ये खुल्या वातावरणामध्ये कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही.या सर्व बाबीचा विचार करून कव्वालीचा कार्यक्रम घेण्याचे पक्षातर्फे ठरवलेले आहे मिरज शहर हे जसे आरोग्य पंढरी आहे शास्त्री संगीत व कलेचा माहेरघर आहे त्याच धरतीवर कव्वालीचाही मोठा शौकीन व रसिक वर्ग आहे.महापालिका जसे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्राउंड उपलब्ध करून देते त्याच धर्तीवर मिरज हायस्कूल क्रीडांगण महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीला उपलब्ध करून द्यावे असे निवेदन महापालिकेला दिले.यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख,सांगली जिल्हा संघटक शकील शेख,मिरज शहर कार्याध्यक्ष अजय बाबर,मिरज तालुका उपाध्यक्ष अमीर मुजावर,मिरज तालुका संघटक लुकामान मुल्ला,कामगार सेलचे मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारुख चौगुले,मिरज शहर युवक उपाध्यक्ष साद गवंडी,हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख,नौशाद मुत्तवली,शोएब कनवाडे,शलमन भोरे,आवेश सय्यद,सलीम कनवाडे व हुसेन बागवान यांच्यासह महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.