उद्योजक मकरंद चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालय भिलवडीचा 69 वा वाचन कट्टा उत्साहात
वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती ; वाचन कट्टा 70 वा मध्ये कै.काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे या पुस्तकावर होणार चर्चासत्र

दर्पण न्यूज भिलवडी सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने 69 वा वाचन कट्टा उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्ष स्थानी चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योजक मा.मकरंदजी चितळे होते .
प्रारंभी वाचन कट्टा संयोजक व कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व गणेशोत्सव पर्यावरण पूरक सण म्हणून साजरा करावा असे आवाहन केले .आजच्या वाचन कट्ट्याचा ज्ञानेश्वर माऊलींच्या संदर्भातील साहित्य असा विषय होता.
यावेळी प्राध्यापक मिलिंद जोशी सर यांनी वाचनालयास भेट दिलेल्या पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आलेले होते. या वाचन कट्ट्यावर हरा जोशी सर रमेश चोपडे जयदीप पाटील जयंत केळकर उत्तम भोई हणमंतराव शिंदे भु.ना.मगदूम या वाचन कट्टा सदस्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकांच्या विषयी मते व्यक्त केली.
सर्वांनीच अभ्यासपूर्ण वाचन केल्याचे जाणवून आले. वाचन कट्ट्याचे आभार प्रदर्शन जयंत केळकर यांनी केले. संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखनिक विद्या निकम माधव काटीकर यांनी केले .
पुढील वाचन कट्टा 70 वा 1 ऑक्टोबर रोजी संपन्न होईल. या वाचन कट्ट्याचा विषय सकाळ प्रकाशनने नुकतेच प्रसिद्ध केलेले काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे या पुस्तकावर चर्चासत्र संपन्न होईल,. अशी माहिती कार्यवाह सुभाष कवडे यांनी यावेळी दिली.