प्रिशा,चतुर्थी,शौनक विवान,सिद्धांत, कुशाग्र,आदित्य,रुहान व विराज आघाडीवर
ब्राह्मण सभा करवीर राज्य निवङ बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूरः अनिल पाटील
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिराजवळ कोल्हापूर येथे ॲड.पी आर मुंडरगी स्मृति एच टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या एकूण पाच फेऱ्या पूर्ण झाल्या. आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित नागपूरचा शौनक बडोले, चौथा मानांकित पुण्याचा सिद्धांत साळुंके, सहावा मानांकित मुंबईचा आदित्य कदम, सातवा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनी, आठवा मानांकित नागपूरचा कुशाग्र पलीवाल, दहावा मानांकित मुंबईचा रुहान माथुर व अकरावा मानांकित मुंबईचा विराज राणे हे सात जण साडेचार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. द्वितीय मानांकित पुण्याचा आरुष डोळस, तृतीय मानांकित पुण्याचा शाश्वत गुप्ता यांच्यासह सहजवीर सिंग मारस नागपूर, हित बलदवा कोल्हापूर, श्लोक माळी पुणे, कश्यप खाकरीया सांगली,ओम रामगुडे पुणे, मार्मिक शहा पुणे, यश मोदानी पालघर, कृषीव शर्मा पुणे व रुतम मोहगावकर पुणे हे बारा जण चार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. मुलींच्या गटात पाचव्या फेरीनंतर तृतीय मानांकित रायगडची प्रिशा घोलप व दहावी मानांकित पुण्याची चतुर्थी परदेशी या दोघीजणी साडेचार गुन्हा सहयुक्तपणे आघाडीवर आहेत. अग्रमानांकित मुंबईची मायशा परवेज द्वितीय मानांकित छत्रपती संभाजीनगरची भूमिका वागळे यांच्यासह सान्वी गोरे सोलापूर, तन्मय घाटे सातारा, हिरन्यमयी कुलकर्णी मुंबई व कार्तिकी ठाकूर मुंबई या सातजणी चार गुणासह द्वितीय स्थानावर आहेत तर चतुर्थ मानांकित मुंबईची महुआ देशपांडे हिच्यासह सिद्धी कर्वे कोल्हापूर, साजिरी देशमुख सातारा, पृथा ठोंबरे सोलापूर, देवान्श्री गावंडे छत्रपती संभाजीनगर व नंदिनी सारडा कोल्हापूर या सहा जणी साडेतीन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,धीरज वैद्य व अनिश गांधी मुख्य स्पर्धा संयोजक म्हणून काम पाहत आहेत तर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने मुख्य पंच म्हणून सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळाविकर तर उपमुख्य पंच म्हणून कोल्हापूरचे फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर यांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ राष्ट्रीय पंच करण परीट,आरती मोदी, रोहित पोळ,रवींद्र निकम, विजय माने, उत्कर्ष लोमटे व प्रशांत पिसे हे सहाय्यक पंच म्हणून काम पाहत आहेत. या स्पर्धा क्लासिकल बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत..