सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने भक्ती योगामध्ये परिश्रम घेतलेल्यांचा सन्मान ; उद्योजक गिरीश चितळे यांची उपस्थिती
मयुरी नलवडे, विद्या निकम आणि .शुभांगी डिसले यांचा समावेश ; कवी सुभाष कवडे यांच्याकडूनही कौतुकाची थाप

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने 21 जून 2025 रोजी भक्ती योग हा योगासनांचा कार्यक्रम सादर करण्यात आलेला होता, वारकरी तालावर उपस्थित महिलांनी अतिशय सुंदर योगासने सादर केली, हे वाचनालयाचे केंद्र फक्त महिलांसाठी आयोजित केलेले होते . हा कार्यक्रम अतिशय सुंदर व नियोजन पूर्वक पार पाडण्यासाठी सौ. मयुरी नलवडे, सौ. विद्या निकम आणि सौ.शुभांगी डिसले यांनी खूपच परिश्रम घेतलेले होते. यानिमित्ताने या तीनही सेविकांचा वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
चितळे डेअरी समूहाचे उद्योजक गिरीश चितळे यांनी या सर्व सेविकांचे मनापासून कौतुक केले यावेळी उपाध्यक्ष डी आर कदम कार्यवाहक सुभाष कवडे गजानन माने प्रथमेश वावरे माधव काटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याचवेळी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी भक्तीयोग कार्यक्रमाचे वाचनालयाच्या माध्यमातून सुंदर नियोजन केल्याबद्दल अध्यक्ष गिरीश चितळे यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे खास अभिनंदनही केले.